









वाकीपाडा येथे महिलांच्या नेतृत्वाखाली लोकसहभागातून तीन माती-गोणीचे बंधारे बांधकाम पूर्ण…
दिवशी (ता. डहाणू) — ग्रुप ग्रामपंचायत दिवशी हद्दीतील मौजे दिवशी, वाकीपाडा येथे आज दि. 31 डिसेंबर 2025, बुधवार रोजी ग्रामपंचायत दिवशी पैकी प्रगती महिला बचत गट- वाकीपाडा येथील महिलांच्या वतीने ग्रामपंचायतीअंतर्गत बंधारा बांधण्याचे काम यशस्वीरीत्या पार पडले. सदर काम वाकीपाडा येथील प्रगती महिला बचत गटाच्या नेतृत्वाखाली तसेच पाड्यातील सहकाऱ्यांच्या सक्रिय लोकसहभागातून करण्यात आले.
ग्रुप ग्रामपंचायत दिवशी अंतर्गत विविध विकासकामे हाती घेण्यात येतात. त्याच अनुषंगाने दिवशी पैकी वाकीपाडा वस्तीच्या बाजूला असलेल्या साखळतोडी नदीवर तीन बंधाऱ्यांचे बांधकाम करण्यात आले. हे सर्व काम नियोजित वेळेत आणि यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे.
हा लोकउपयोगी प्रकल्प “पाणी अडवा – पाणी जिरवा” या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून, त्यामुळे पाणी साठवण क्षमता वाढून शेतीसाठी तसेच गुरे-जनावरांसाठी पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. या उपक्रमात स्थानिक महिला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त व सक्रिय सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला.
या विकासकामात माननीय सरपंच साहेब, उपसरपंच साहेब, ग्रामसेवक साहेब तसेच ग्रामपंचायत सदस्यांची मोलाची भूमिका लाभली. ग्रामपंचायतीच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नागरिकांचा सहभाग घेतल्याने बंधाऱ्यासारखी कामे जलद गतीने पूर्ण होऊ शकतात, असे यावेळी नमूद करण्यात आले.
हा उपक्रम परिसरातील पाण्याची टंचाई कमी करण्यास उपयुक्त ठरेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. तसेच भविष्यातही प्रगती महिला बचत गट वाकीपाडा यांचे ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांमध्ये नेहमीच सक्रीय सहकार्य राहील, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
ग्रुप ग्रामपंचायत दिवशी हद्दीतील मौजे दिवशी गडदपाडा येथे दि.21/12/2025, वार- रविवार रोजी, ग्रामपंचायतीच्या सहाय्याने बंधारा बांधण्याचे काम माजी सरपंच श्री. रमण सक्या भावर यांच्या नेतृत्वात आणि पाड्याती सहकार्यांच्या लोकसहभागाने पार पडले. हे लोकउपयोगी प्रकल्प ग्रामीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे., ज्यामध्ये स्थानिक ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग आहे.
कार्यक्रमाचे स्वरूप
ग्रुप ग्रामपंचायत दिवशी अंतर्गत विविध विकासकामे करण्यात येतात. ज्यामध्ये दिवशी पैकी गडदपाडा येथे बंधारा बांधकाम हे काम यशस्वी पुर्ण झाले. हे पाणी संरक्षण- शेतीसाठी, आणि गुरे-जनावरे यांना उपयुक्त ठरते, ज्यात माजी सरपंच श्री. रमण सक्या भावर यांचे पाड्यातील सहकारी यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.
लोकसहभागाचे महत्त्व
विविध लोकापयोगी कार्यक्रमात ग्रामपंचायतीच्या सहाय्याने स्थानिक लोकांचा सहभाग घेतला जातो, ज्यामुळे बंधारा सारखी कामे जलद गतीने पूर्ण होतात. ग्रा.पं. अध्यक्ष सरपंच, ग्रामसेवक, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य, व ग्रामस्थ यांच्या मदतीने केलेला हा उपक्रम स्थानिक भागात पाण्याची टंचाई कमी करण्यास मदत होईल.
